Monday 16 January 2017

The Habit of Winning

" एकदा एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचा मालक आपल्या अति महत्वाच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर , एका ठिकाणी तातडीच्या मिटिंग ला निघाला होता . . मोठी आलिशान गाडी होती . आणि प्रवास साधारण तीन चार तासाचा होता . सर्वजण सकाळी लवकर निघाले होते .

गाडी वाटेत आल्यावर . . गाडीच्या ड्रायव्हर ला लक्षात आले कि मागील एक चाक पंक्चर आहे , त्याने ती गाडी एका बाजूला घेतली . आणि सर्वाना उतरायला सांगितले . सर्वजण तसे खुश झाले कारण सगळे सकाळीच निघाल्याने आणि मध्ये न थांबल्याने ब्रेक हवाच होता . मालक आणि बाकी सर्वजण उतरून इकडे तिकडे गेले . कोणी जवळच्या धाब्यावर सिगारेट ओढू लागले . कोणी झुडुपाआड गेले .

अर्ध्यतासाने सर्वजण एका ठिकाणी एकत्र जमले पण सर्व टीम एकत्र आली मात्र मालक नाही दिसले . सगळे जण शोधायला लागले पण कुठे दिसेना . दहा मिनिटानी सर्वजण जिथे गाडी पंक्चर झाली होती तिथे जमले तर , मालक हातात पाना घेऊन . . शर्टाचे हात कोपरापर्यंत दुमडून . . घामेघूम होऊन . . चेहऱ्यावर मंद स्मित ठेवून ड्रायव्हर ला स्टेपनी चे चाक हातात घेऊन मदत करताना दिसले .

आणि तिथेच पहिला धडा सर्व उच्च अधिकार्यांना मिळाला . " थोर व्हायला . . . तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावे लागते आणि जमिनीवरील प्रॉब्लेम माहित असावे लागतात . नुसते आदेश सोडून अधिकारी बनतात . . . मालक नाही होता येत . "

त्या उद्योपतीचे मालकाचे नाव . . " श्री. रतन टाटा " . . नाशिक येथे नेल्को ची टीम घेऊन जाताना प्रत्यक्ष घडलेला प्रसंग.

संदर्भ : The Habit of Winning

No comments:

Post a Comment